पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम 7 मार्च पासून श्रीवर्धन येथे होणार सुरू

 

अलिबाग, दि.03 (जिमाका):- पर्यटन क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई यांच्यावतीने दि.7 ते 11 मार्च 2022 या कालावधीमध्ये श्रीवर्धन येथील माळी समाज मंदिर हॉल, दबक पहाडी रोड, आर.एन. राऊत हायस्कूल जवळ या ठिकाणी पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे विविध स्थानिक युवकांना पर्यटना विषयक रोजगाराची माहिती मिळून व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती उपसंचालक (पर्यटन) कोकण विभाग, नवी मुंबई श्री.हनुमंत हेडे यांनी दिली आहे.

पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत (आय.आय.टी.टी.एम) तसेच पर्यटन संचालनालयातील तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणासाठी स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी 30 प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल त्याचप्रमाणे त्यांना ओळखपत्रही देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयाकडून सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा तसेच कॅप आणि मास्क सुध्दा नि:शुल्क देण्यात येणार आहे, अशी माहिती उपसंचालक (पर्यटन) कोकण विभाग, नवी मुंबई श्री.हनुमंत हेडे यांनी दिली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक