अलिबाग येथे उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन

 

 

अलिबाग,दि.9(जिमाका) :- राष्ट्रीय महिला आयोग, भारत सरकार नवी दिल्ली पुरस्कृत व भारतीय उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद, प्रकल्प कार्यालय अलिबाग द्वारा गुरुवार, दि. 15 जून 2023 रोजी सकाळी 10 ते  सायंकाळी 5 या वेळेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय अलिबाग येथे महिलांकरिता उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम नि:शुल्क स्वरूपाचा असून यामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास,उद्योजकतेचे महत्व, यशस्वी उद्योजकांसोबत चर्चा व यशोगाथा, उद्योजकीय कल्पना, मागणी व पुरवठ्यातील अंतर, नेतृत्व गुण, महिला उद्योजिकांसमोरील आव्हाने, शासकीय कर्ज योजनांची माहिती इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन साधन व्यक्तीद्वारे करण्यात येणार आहे.

 उद्योजकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिला उद्योजिका, महिला बचत गटातील सदस्या, व्यवस्थापन क्षेत्रातील महिला, बेरोजगार महिला व युवती यांना स्वयंरोजगार निर्माण करण्याकरिता उपयुक्त आहे.  प्रवेश मर्यादित असून पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही अट नाही. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी शशिकांत दनोरीकर (मो.7775802497) प्रकल्प अधिकारी, भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय) मधुकुंज बिल्डिंग, पहिला माळा, एसटी स्टँड समोर अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, भारतीय उद्योजकता विकास संस्था शशिकांत दनोरीकर  यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक