बालकामगार अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता जनजागृती मोहिमेत सहभाग नोंदवावा --कामगार उपायुक्त प्र.ना.पवार


 

अलिबाग,दि.9(जिमाका):- बालकामगार ही सामाजिक अनिष्ट प्रथा असून या प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याकरिता समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, याकरिता सातत्याने शासनाच्या विविध विभागांमार्फत व विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

             दि.12 जून 2023 या जागतिक बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून कामगार उपायुक्त पनवेल कार्यालयामार्फत विविध जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.12 जून ते दि.17 जून 2023 या कालावधीत विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

       जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, क्रीडाई-बांधकाम व्यवसायातील मालक असोसिएशन व वीटभट्टी चालक आणि मालक असोसिएशन तसेच सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, नागरिकांनी बालकामगार या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता जनजागृती करून या मोहिमेत सहभाग नोंदवावा व रायगड जिल्हा बालकामगार मुक्त करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन कामगार उपायुक्त पनवेल प्र.ना.पवार यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक