जिल्ह्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे प्रस्ताव दि.30 जूनपर्यंत सादर करण्याचे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांचे आवाहन
अलिबाग, दि.06 (जिमाका):- अल्पसंख्यांक विकास विभागाकडून धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
रायगड जिल्हयातील इच्छुक शाळांनी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता विहीत नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे दि.30 जुन 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, रायगड अलिबाग श्री.जयसिंग मेहेत्रे, यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment