जिल्ह्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे प्रस्ताव दि.30 जूनपर्यंत सादर करण्याचे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांचे आवाहन

 

 

अलिबाग,दि.09 (जिमाका):- अल्पसंख्यांक विकास विभागाकडून धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.

रायगड जिल्हयातील इच्छुक शाळांनी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता विहीत नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे दि.30 जुन 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, रायगड अलिबाग श्री.जयसिंग मेहेत्रे, यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक