बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन तर्फे 59 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

 

 

अलिबाग, दि.7(जिमाका):- बँक ऑफ इंडिया ऑफिस असो. मुंबई व गोवा यूनिट यांच्या ५९व्या  स्थापना दिवस मुंबई, गोवा सहित अलिबाग येथेही दिमाखात  साजरा करण्यात आला.

               युनिट चे जनरल सेक्रेटरी यांच्या मार्गदर्शनाखाली बीकेसी मुंबई, पणजी - गोवा सोबत रायगड-अलिबाग येथे रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बँक ऑफ इंडिया, रायगड  विभागाचे प्रमुख श्री. मुकेश कुमार, उपप्रमुख श्री. जॉन लोबो व  बँक ऑफ इंडिया ऑफिस असोशियसनचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी श्री. अजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

              जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांच्यामार्फत झालेल्या या शिबिरास बँकेचे अग्रणी जिल्हा प्रबंधक श्री. विजयकुमार कुलकर्णी व अधिकारी संघटनेचे कमिटी मेंबर श्री. कालिदास माने यांची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण रायगड जिल्हयातील बँक अधिकारी, व इतर कर्मचा-यांनी रक्तदान करून समाजासाठी मोलाचे सहकार्य केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक