सहाय्यक व्यवस्थापक व स्वयंपाकी पदासाठी इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत


 

अलिबाग,दि.9(जिमाका):-जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या  जंजिरा सैनिकी विश्रामगृह, गोंधळपाडा-अलिबाग येथे  एकत्रित मासिक मानधनावर कंत्राटी पध्दतीने एक अशासकय सहाय्यक व्यवस्थापक हे निवासी पद स्थानिक परिसरातील माजी सैनिक संवर्गामधून तसेच एक महिला/पुरुष स्वयंपाकी हे पद भरावयाचे आहे.

इच्छूक उमेदवारांनी आपला अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे स्वहस्ते कार्यालयीन वेळेत दि. 25 जून 2023 पर्यंत सादर करावा. या दोन्ही पदासाठी मासिक मानधन, कामाचे तास तसेच कामाचे स्वरुप हे उमेदवाराशी मुलाखतीचे दरम्यान सांगण्यात येईल. इतर आवश्यक माहितीकरिता कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02141-222208 वर संपर्क साधावा, असे  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. 

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक