डॉ.एस एस भामरे यांची सहसंचालक पदी नियुक्ती


 

अलिबाग,दि.9(जिमाका):- शासकीय तंत्रनिकेतन पेण या संस्थेचे प्राचार्य डॉ.एस.एस. भामरे यांची तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे सहसंचालक या पदावर दि. 31 मे 2023 रोजी नियुक्ती करण्यात आली. डॉ.एस एस. भामरे हे शासकीय तंत्रनिकेतन पेण या संस्थेत दि. 11 ऑक्टोबर 2018रोजी रुजू झाले होते.  त्याआधी ते लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ येथे कुलसचिव पदी होते.  डॉ.भामरे यांनी त्यांच्या कार्यकाळात शासकीय  तंत्रनिकेतन  पेण या संस्थेत शैक्षणिक व पायाभूत सुविधांमध्ये अमुलाग्र असे बदल घडवून आणले.  एखादा शासकीय अधिकारी समर्पण व सहेतुने जर कार्य करीत असेल तर कोणत्याही संस्थेत कसे बदल घडतात याचे शासकीय तंत्रनिकेतन पेण हे एक उत्तम उदाहरण आहे. 

            शासकीय तंत्रनिकेतन पेण या संस्थेत शैक्षणिक वातावरण उत्कृष्ट राहील याकडे त्यांनी जातीने लक्ष दिले. त्यांच्या कार्यकाळात संस्थेत शंभर टक्के प्रवेश झालेले आहेत.  तसेच संस्थेचा निकाल सातत्याने उंचावत गेलेला आहे.  या संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्त्या मिळालेल्या आहेत.

डॉ.भामरे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे 350 वृक्षांची संस्था परिसरात लागवड केली व त्यांचे संवर्धन केले आहे.  तसेच ठिबक सिंचन प्रणाली राबविली आहे.  संस्थेची मैदाने, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता रॅम्प व शौचालय यांची देखील निर्मिती त्यांनी केली.  बंद पडलेल्या प्रयोगशाळा त्यांनी कार्यान्वित केल्या तसेच संस्थेच्या परिसराची मोजणी करून घेऊन सीमारेषा निश्चित केल्या आहेत व संरक्षक भिंती बांधल्या  आहेत.  विकासात्मक कामांची मांडणी व आखणी करून संस्था सुधारण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करून बदल घडवून आणले. विकासात्मक कामांची मांडणी व आखणी करून संस्थेची भरभराट करण्याकरिता त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आमुलाग्र बदल घडवून आणले.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक