महिला आर्थिक विकास महामंडळाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न रायगड जिल्ह्याला मिळाला उतेजनार्थ श्रेणीतील पुरस्कार

 

अलिबाग,दि.9(जिमाका):- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत सन 2022-23 या वर्षाचा राज्यस्तरीय आढावा व पुढील नियोजन कार्यशाळा हॉटेल ग्रेप सिटी, त्रंबकेश्वर, नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती.

       या कार्यशाळेत ज्या जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण कामगिरी केली, अशा जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये कोकण विभागातून ठाणे जिल्हा राज्यात लो लोडेड जिल्ह्यामध्ये रायगडाला उतेजनार्थ श्रेणीत पुरस्कार मिळाला.

      या बैठकीत राज्यातील सर्व जिल्ह्यांचा विभाग निहाय सन 2022-23 या वर्षातील कामगिरी बाबत आढावा घेण्यात आला. तसेच विविध मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.

     या जिल्ह्यांना व्यवस्थापकीय संचालक माविम मुंबई डॉ.इंदूमती जाखड (भा.प्र.से.), महाव्यवस्थापक (प्रकल्प) माविम कुसुम बाळसराफ व महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) रविंद्र सावंत यांच्या हस्ते मोमेंटो व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

       यावेळी कार्यक्रम व्यवस्थापक, माविम, श्री.महेंद्र गमरे, श्रीम.रूपा मेस्त्री, श्रीम. गौरी दोंदे, राखी मिराशी कॅफो तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील माविम मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

      कोकण विभागातील सर्व CMRC नी उत्तम कामगिरी बजावल्यामुळे त्या जिल्ह्यास गौरविण्यात आले. तसेच सर्व जिल्हा, तालुका सहकारी स्टाफ व सर्व CMRC पदाधिकारी, कर्मचारी या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा समन्वयक  वर्षा पाटील यांनी दिली आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक