जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11 मि.मी.पावसाची नोंद
अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- रायगड
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.46 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1
जून पासून आजअखेर एकूण सरासरी 2 हजार 890.95 मि.मी.
पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
आज सकाळी
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-
अलिबाग 3.00
मि.मी., पेण-12.00 मि.मी., मुरुड-2.00 मि.मी., पनवेल-11.60 मि.मी., उरण-5.00
मि.मी., कर्जत-10.00 मि.मी., खालापूर-15.00 मि.मी., माणगांव-4.00 मि.मी., रोहा-16.10
मि.मी., सुधागड-20.00 मि.मी., तळा-21.00 मि.मी., महाड-7.00 मि.मी., पोलादपूर-19.00
मि.मी., म्हसळा-10.00मि.मी., श्रीवर्धन-2.00 मि.मी., माथेरान-25.60 मि.मी., असे
आजचे एकूण पर्जन्यमान 183.30 मि.मी.इतके असून सरासरी 11.46 मि.मी. इतकी आहे.
आजपर्यंतची एकूण पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 89.88
मि.मी.इतकी टक्के आहे.
00000
Comments
Post a Comment