समाज कल्याण विभागाच्या वैयक्तिक अर्थसहाय्य लाभ व सामूहिक योजनेसाठी पात्र मागासवर्गीय लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

 


 

अलिबाग, दि.14(जिमाका):- रायगड जिल्हा परिषदेच्या सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात 20 टक्के जिल्हा परिषद सेस निधीमधून वैयक्तिक अर्थसहाय्य लाभाच्या योजना डीबीटी तत्त्वावर व सामूहिक योजना राबविण्यात येत आहे.

       या योजना पुढीलप्रमाणे आहेत-   

       वैयक्तिक योजना :- संगणक, शिलाई मशीन, ड्रायव्हिंग, बांबू फर्निचर प्रशिक्षणासाठी सहायक अनुदान, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणे, मागासवर्गीय युवकांना वेल्डिंग कामासाठी मशीन पुरवणे.

      सामूहिक योजना :- मागासवर्गीय वस्तीत व वस्तीवर जाणाऱ्या सौर ऊर्जा प्रकाश योजना, मागासवर्गीयांसाठी अनुदानित वसतीगृहांना सोयी सुविधा पुरविणे (सतरंजी व चादरी पुरविणे), मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरासाठी खुर्ची पुरविणे, मागासवर्गीयांना समाज मंदिरास सतरंगी पुरविणे, व्यायाम शाळांना साहित्य पुरविणे, सामूहिक व्यवसायासाठी मंडपाचे साहित्य पुरविणे.

      या योजनांसाठी पुढीलप्रमाणे एकत्रितपणे सर्वसाधारण आवश्यक निकष आहेत-

     वैयक्तिक योजना- लाभार्थ्यांचा नमुन्यातील अर्ज (गट विकास अधिकारी यांच्या मार्फत), शासनाचे आवश्यक अभ्यासक्रम प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीच्या दाखला (सक्षम अधिकाऱ्यांचा), उत्पन्नाचा दाखला (रु.80 हजार पर्यंत), एकाच कुटुंबातील एकच लाभलेला लाभ दिल्याबाबतचे गटविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र, योजनेंतर्गत अनुदान रोख रकमेच्या स्वरूपात देण्यात येईल, हे अनुदान लाभार्थ्याच्या आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, लाभार्थ्याने मंजूर परिमाणाप्रमाणे (specification) वस्तू खरेदी करण्याची आहे, त्यामध्ये तांत्रिक समितीने केलेली किंमत किंवा लाभार्थी प्रत्यक्ष साहित्य खरेदी केलेली किंमत यामध्ये कमी असलेली रक्कम खात्यावर जमा करण्यात येईल, कुटुंबातील कोणीही व्यक्ती शासकीय अगर निमशासकीय सेवेत नसल्याचा दाखला.

      सामूहिक योजना :- लाभार्थ्याचा नमुन्यात अर्ज (गट विकास अधिकारी यांच्यामार्फत), ग्रामपंचायतीचा लाभार्थी निवडीबाबतचा ठराव, मागासवर्गीय लोकसंख्येचा दाखला, मागासवर्गीय असल्याचा दाखला, एकाच गावात योजनेचा लाभ एकाच वेळी दुबार मिळणार याची गटस्तरावर खात्री केल्याचा दाखला.

      या योजनेच्या निकषानुसार पात्र असलेल्या मागासवर्गीय व्यक्तींनी साधारणतः दि. 30 सप्टेंबर 2022 पूर्वी संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून विविध प्राप्त करून घ्यावा व आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रतीसह परिपूर्ण अर्ज गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत समाज कल्याण विभागाकडे सादर करायचा आहे, असे रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी  कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड