नवीन “आपले सरकार सेवा केंद्र” सुरु करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन

 


अलिबाग,दि.12 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील सध्या रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी https://raigad.gov.in या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.12 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत नोंदणी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे सादर करावेत. आपले सरकार सेवा केंद्राबाबत माहितीसाठी माहिती व तंत्रज्ञान कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

महाराष्ट्र राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई-सेवा केंद्रे, सेतू सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना आपले सरकार सेवा केंद्र हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे ब्रँडिंग करण्यात आले आहे.

प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान एक केंद्र स्थापन करण्यात येईल, मात्र 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या (2011 च्या जनगणनेनुसार) किमान 2 केंद्रे स्थापन करण्यात येईल. शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद 10 हजार लोकसंख्येसाठी एक केंद्र स्थापन करण्यात येईल.

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज मागणी: कालावधी- 30 दिवस, दि.13 सप्टेंबर ते दि.12 ऑक्टोबर 2022 पर्यंत.

प्राप्त आपले सरकार सेवा केंद्रांच्या मागणी अर्जांची छानणी: कालावधी- 28 दिवस, दि.13 ऑक्टोबर ते दि.9 नोव्हेंबर 2022 पर्यंत.

प्राप्त आपले सरकार सेवा केंद्रांच्या मागणी अर्जांवर जिल्हास्तरीय कार्यवाही करिता: कालावधी- 21 दिवस, दि.10 नोव्हेंबर ते दि.30 नोव्हेंबर 2022 पर्यंत.

रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण केंद्रांची माहिती:-

एकूण ग्रामीण केंद्र: 884 (कार्यरत- 473, रिक्त- 430), शहरी केंद्र: 106 (कार्यरत- 123, रिक्त- 3)

नियोजित केंद्रांची तालुकानिहाय संख्या:-

अलिबाग- 16, कर्जत- 12, खालापूर- 16, महाड- 94, माणगाव- 31, म्हसळा- 28, मुरूड- 9, पनवेल- 35, पेण- 33, पोलादपूर- 29, रोहा- 34, श्रीवर्धन- 27, सुधागड- 23, तळा- 20, उरण- 23.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक