महाड पुल दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
दूरध्वनी -222019, ई मेल- dioraigad@gmail.com,                dioabg@rediffmail.com
फेसबुक :- dioraigad        ट्विटर :- dioraigad
वृ.क्र.471                                                                     दिनांक :- 03/08/2016
महाड पुल दुर्घटनेची
 सखोल चौकशी केली जाईल
                                           - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


अलिबाग दि.3 :- महाड पुल दुर्घटना अतिशय दुर्देव असून बेपत्ता नागरीक व वाहनांचा युध्द पातळीवर शोध घेण्यात येत आहे. या दुर्देवी घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाड येथे दिली.
महाड पोलादपूर रस्त्यावरील बिरवाडी जवळच्या  सावित्री नदीवरील वाहून गेलेल्या जुन्या पुलाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी आज केली. त्यांच्या समवेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री रायगड प्रकाश महेता, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.उपक्रम) एकनाथ शिंदे तसेच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रविण दरेकर, जि.. अध्यक्ष सुरेश टोकरे  आदि उपस्थित होते.
शोध कार्य हेच प्राधान्य
घटनास्थळास प्रत्यक्ष भेट देऊन मुख्यमंत्री महोदयांनी पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याशी घटने संदर्भात चर्चा करुन शोध कार्याची सविस्तर माहिती घेतली. युध्द पातळीवर शोध मोहिम ठेवून बेपत्ता नागरीक व वाहनांचा तपास करावा अशा सुचना दिल्यातसेच घडलेली घटना अतिशय दुर्देवी असून भविष्यात असे होऊ नये यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. त्यासाठी राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले जाईल. राज्य शासना समोर सध्या शोध कार्य हेच प्राधान्य असल्याने हवाई दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, नौदल, तटरक्षक दल, स्थानिक आदिंच्या मदतीने शोध कार्य शेवट पर्यंत सुरु राहील. यात 300 किलो वजनाचा चुंबक राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला मार्फत शोध कार्यासाठी वापरण्यात येत आहे. त्याद्वारे वाहनांचा शोध घेतला जाईल असे ही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक, महाड प्रांत श्रीमती सुषमा सातपुते व इतर अधिकारी उपस्थित होते.
000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड