एचआयव्ही जनजागृतीसाठी 'विरा' या लघुपटाचे विमोचन


अलिबाग, जि. रायगड, दि.९ (जिमाका)- एचआयव्ही एडस व एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तिंना सन्मानाची वागणूक देण्यासंदर्भात जनजागृती करणाऱ्या 'विरा' या लघुपटाचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली राजस्व सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग, ता. अलिबाग, जि. रायगड येथे मंगळवारी (दि.८) जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातर्फे  एचआयव्ही-क्षयरोग कमिटीची बैठक झाली.
            यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ, अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,  डॉ. प्राची नेहूलकर,  समन्वयक मनोज बामणे, वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी एआरटी डॉ.पांडुरंग शिंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. कोकरे, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक नवनाथ लबडे, जिल्हा सहाय्यक (लेखा) रविंद्र कदम,  जिल्हा सहाय्यक (एम ॲण्ड इ) रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम संपदा मळेकर, आधार ट्रस्ट चे किशोर तरवडे,सचिन अवस्थी, प्रकाश तांगडे, महिला व बालकल्याण अधिकारी व्ही. वाय . मोरे, जागृती गुंजाळ, सीसीसी एआरटी प्रेम खंडागळे आदी उपस्थित होते. 
वारली फिल्म प्रॉडक्शनचे दिग्दर्शक संजय रेड्डी व त्यांचे सहकारी यांनी  एचआयव्ही-एडस  जनजागृतीपर तयार केलेल्या 'विरा' या शॉर्टफिल्मचे विमोचन जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिगदर्शक रेड्डी व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या लघुपटासाठी कार्यकारी संचालक आरसीएफ कंपनी थळ यांनी सहकार्य केले आहे.
            यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग रायगड यांच्यामार्फत सन २०१७-१८ जनरल क्लायंटकरीता ६१५०० इतके उद्दिष्ट होते. त्यानुसार १०१४७५ (१६५ टक्के) इतक्या व्यक्तींची   एचआयव्ही  समुपदेशन व तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ४६१ व्यक्तींना  एचआयव्ही  संसर्ग असल्याचे आढळून आले. त्यापैकी ४१७ (९०. ४६ टक्के) एआरटी केंद्राला उपचाराकरिता संदर्भित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. तसेच गरोदर मातांकरिता ४१९३० इतके उद्दिष्ट असून ५१६९२ (१२३. २८ टक्के) इतक्या गरोदर मातांची  एचआयव्ही  समुपदेशन व तपासणी करण्यात आल्याचे समजते त्यामध्ये एकूण १६ गरोदर माता  एचआयव्ही संसर्गित असून त्यापैकी १६ गरोदर माता एआरटी उपचाराकरिता संदर्भित करण्यात आल्याचे समजते 
        एचआयव्ही- क्षय कार्यक्रमांतर्गत एकूण ६४५० (१३. ३६ टक्के) इतक्या संशयित असणाऱ्या रुग्णांना त्यामध्ये ३६८  एचआयव्ही  संशयित व्यक्तींना व ६०८२  एचआयव्ही  संसर्ग नसलेल्या व्यक्तींना थुंकी नमुना तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले असून त्यामध्ये ५०१ व्यक्तींना क्षयरोग असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी ४८९ व्यक्तींना क्षयरोग उपचार सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच ३५०१ क्षयरोग उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३४२३ रुग्णांची  एचआयव्ही  समुपदेशन व तपासणी केली असता त्यामध्ये ७ व्यक्तींना  एचआयव्ही  संसर्ग असल्याचे आढळून आले. तसेच २९ व्यक्तींना  एचआयव्ही  व क्षय हे दोन्ही संसर्ग  असल्याचे निदर्शनास आले. 
       एचआयव्ही  सह जगणाऱ्या व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ देऊन सेवा सवलती मिळाव्यात याकरिता मा. जिल्ह्याधिकारी  रायगड यांचेमार्फत जिल्ह्याचे नोडल ऑफिसर म्हणून एन. बी.लोखंडे यांची निवड करण्यात आली. एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तींना  तसेच अतिधोकादायक गटातील व्यक्तिंना रेशनकार्ड मिळावे यासाठी लाभार्थ्यांची यादी डापकूने सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.
           जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी स्वागत केले व मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले व आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक