'महाराष्ट्र वार्षिकी 2018' उत्तम संदर्भ ग्रंथ-जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
निर्मित ‘महाराष्ट्र वार्षिकी 2018’ हा ग्रंथ उत्तम संदर्भ ग्रंथ असून स्पर्धा
परीक्षा देणारे विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी कर्मचारी साऱ्यांच्या
संग्रही तो असावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
‘महाराष्ट्र वार्षिकी 2018’
हा ज्ञान व माहितीचा खजिना असलेला संदर्भग्रंथ नवीन आकर्षक स्वरुपात वाचकांसाठी
उपलब्ध झाला आहे. या ग्रंथाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी
वरील प्रतिक्रिया दिली.
या संदर्भग्रंथात
महाराष्ट्राची विविध क्षेत्रातील माहिती आकडेवारीसह देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा इतिहास, वन, नद्या, कृषी, क्रीडा, कला, साहित्य, पुरस्कार आदि
घटकांचा यात समावेश करण्यात आला आहे.
या वार्षिकीचे महत्वाचे
वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या सर्व विभागांची कामकाज पध्दती, संरचना, महत्वाचे
निर्णय, धोरणे, योजना, दूरध्वनी यांची एकत्रित माहिती अभ्यासकांना उपलब्ध होणार
आहे. याशिवाय मंत्रिमंडळाचे निर्णय, महाराष्ट्र शासनाशी संबंधित गेल्या वर्षभरातील
घडामोडींचा समावेशही यात केला आहे. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,
प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, केंद्राचे व महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, आजवरचे
विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती व उपसभापती, महाराष्ट्र
विधिमंडळ सदस्य यांची यादी, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांकांची
माहिती ही या वार्षिकीत समाविष्ट करण्यात आल्याने हा संदर्भग्रंथ खूप महत्त्वाचा
आहे.
माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयातर्फे प्रसिध्द केलेला महाराष्ट्र वार्षिकी 2018 हा संदर्भग्रंथ
विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, अभ्यासक, प्राध्यापक, पत्रकार,
लोकप्रतिनिधी, अधिकारी व सामान्यज्ञानाची आवड असणाऱ्या सर्व नागरीकांना उपयुक्त
आहे.
महाराष्ट्राची अधिकृत,
वस्तुनिष्ट माहिती देणाऱ्या संदर्भग्रंथाची गरज अनेक वर्षापासून वाचकांनी व्यक्त
केली होती. महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून तयार
झालेल्या महाराष्ट्र वार्षिकी 2018 या संदर्भग्रंथाच्या रुपाने ही गरज पूर्ण झाली
आहे.
महाराष्ट्र वार्षिकी 2018 या
संदर्भग्रंथाची किंमत फक्त 250 रुपये ( रुपये दोनशे पन्नास मात्र) आहे. या संदर्भ
ग्रंथासाठी जिल्हा माहिती कार्यालय, पाध्येवाडी, बालाजी नाका, बँक ऑफ इंडियाच्या
समोर, अलिबाग, ता.अलिबाग, जि.रायगड दूरध्वनी क्रमांक 02141-222019 येथे संपर्क साधावा.
या संदर्भग्रंथाच्या प्रती
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच पुस्तक विक्रेत्यांना सवलतीच्या दराने
उपलब्ध करुन देण्यात येतील. पुस्तिकेच्या मर्यादित प्रती शिल्लक असल्याने गरजूंनी
तातडीने जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क
साधून आपली प्रत आजच राखून ठेवावी,असे आवाहन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद
दुसाने यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment