ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक सुट्टी जाहीर



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22:- जिल्ह्यात जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक व रिक्त पदे असलेल्या ठिकाणी पोटनिवडणूक  रविवार दि.27 मे रोजी चा पार पडणार आहेत.
तालुकानिहाय सार्वत्रिक व पोट निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती -अलिबाग- 15 मुरुड-14,पेण-7 व पोट-1,  पनवेल-14, उरण-1 कर्जत-5,खालापूर-21, माणगांव-19, तळा-5,रोहा-7 व पोट-4, सुधागड-11, महाड-14, पोलादपूर-11, श्रीवर्धन-5, म्हसळा-10 एकूण- सार्वत्रिक-159  तर पोटनिवडणूक-5
स्थानिक 3 सुट्टयांच्या व्यतिरिक्त ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्षेत्रात निवडणूकीच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्षेत्रात निवडणूकीच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे,असे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक