स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान


रायगड(जिमाका)दि.3 : देशाला स्वांतत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. या महोत्सवाचा समारोप म्हणून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ‘मेरी माटी मेरा देश....मिट्टी को नमन, विरों का वंदन’ हा उपक्रम मोठया उत्साहाने जिल्हाभरात राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी सांगितले.

देशात 2021 पासून सुरू झालेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 15 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. यावर्षी मातीला केंद्रबिंदू ठेवून कार्यक्रम साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.  जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व तालुक्यातून माती गोळा केली जाणार असून ही माती एकत्रित करत एका कलशातून दिल्लीच्या कर्तव्यपथावर नेली जाणार आहे. तेथे प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या मातीतून ‘अमृतवाटिका’ बाग तयार केली जाणार आहे.

  शासनाने दिलेल्या पंचसुत्री अंतर्गत प्रत्येक गामपंचायत स्तरावर व मनपा कार्यक्षेत्रात ध्वज उभारायचा आहे. ध्वजासोबत सेल्फी घेणे, वसुधा वंदन अतंर्गत प्रत्येक गावात वृक्ष लागवड करणे, विरों का वंदन अंतर्गत स्वांतत्र्य सैनिकांना नमन करणे व 15 ऑगस्ट रोजी शिलाफलकम ऊभारून राष्ट्रगिताचे गायन करावयाचे आहे.

देशासाठी बलिदान दिलेले स्वातंत्र्य सैनिक, प्रत्येक सैन्य आणि निमलष्कराशी निगडित लोकांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिवाय, प्रत्येक गावात 75 झाडे लावण्याचा कार्यक्रमही होणार आहे. शाळा व महाविद्यालयांना तसेच जिल्ह्यातील सामाजिक संस्थाना या उपक्रमात सहभागी करुन घ्यावे. पोलीस विभागाने पोलीस स्टेशन स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करावे. प्रत्येक गावस्तरावर करण्यात आलेले कार्य पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक