सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

अलिबाग,दि03(जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी दि.10 ऑगस्ट पर्यंत अर्ज  सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त  समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागामार्फत  सन-2019-20,2020-21,2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर, समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रोहिदास पुरस्कार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पुरस्काराकरीता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे

 जन्मतारीख, वय (प्रत्येक पुरस्कारासाठी पुरुषांसाठी किमान 50 वर्ष, महिलांसाठी किमान 40 वर्ष राहील), संस्था-संस्थेचे पूर्ण नाव व संपूर्ण पत्ता. व्यक्ती-जात (मागासवर्गीय असल्यास जातीच्या दाखल्याची प्रत), संस्था- संस्थेची नोंदणी अधिनियम 1860, मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950. व्यक्ती- अर्जदाराचे चारित्र्य प्रमाणपत्र/विना दुराचार प्रमाणपत्र (पोलिस विभागाकडील दाखला), संस्था-संबंधित संस्थेचे कार्यक्षेत्र. व्यक्ती- गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र, सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र. संस्थनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.  संस्थेच्या कार्यकारी मंडळातील अध्यक्ष/सचिव यांचे नांव, पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती. व्यक्ती-व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र, संस्था- सदर संस्थेविरुद्ध अथवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला नसल्याबाबत पोलिस अधिक्षकांचा दाखला. व्यक्ती-व्यक्तीने केलेल्या विशेष कार्याचा तपशील, संस्था-गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र, सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, संस्थेच्या विशेष कार्याचा तपशील. व्यक्ती-अनु.जाती/जमाती/भटक्या विमुक्त जाती/मनोदुर्बल/अपंग कुष्ठरोगी इ.कार्यक्षेत्रात केलेल्या कार्याचा थोडक्यात तपशील, संस्था- संस्थेच्या विशेष कार्याचा तपशिल. व्यक्ती- प्रस्तावातील सर्व कागदपत्रे साक्षांकित केलेली असावीत, संस्था-संस्थेच्या घटनेची प्रमाणित प्रत व मागील 5 वर्षाचा वार्षिक अहवाल. व्यक्ती-भूमीहिन शेतमजूर व कामगारांसाठी केलेल्या उल्लेखनीय कामाचा तपशील (पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारासाठी), संस्था-स्वतंत्र लेखा परिक्षण होत असल्यास तीन वर्षाचा अहवाल. व्यक्ती-मातंग समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक व आर्थिकदृष्टया कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाचा तपशील (साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारसाठी), संस्था-सामाजिक सेवेचा कालावधी संबंधित संस्था केव्हापासून सुरु आहे (अनुदानित / विनाअनुदानित तत्वावर). व्यक्ती-सामाजिक सेवेचा कालावधी, संस्था- संस्था माध्यमातून व्यक्तीगत अथवा सामूहिक सेवा दुर्बल घटकांना व मागावर्गीयांसाठी घेत असलेले उपक्रम असल्यास, कोणत्या स्वरुपात व त्यांनी घेतलेल्या उपक्रमांचा सविस्तर तपशील. व्यक्ती-शिफारस करणाऱ्या सन्माननीय व्यक्तीचे नाव, पदनाम, संस्था-संस्थेने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना शासनामार्फत किंवा विभिन्न संस्थेमार्फत सत्कार अथवा पारितोषिक मिळाले असल्यास त्याचा तपशिल. व्यक्ती- शिक्षण, संस्था-सदर संस्थेस पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस केलेल्या सन्माननीय व्यक्तीचे नांव व पदनाम. व्यक्ती-नोकरी, व्यवसाय, संस्था-संस्थेचे वैशिष्टयपूर्ण उपक्रमांचा तपशिल. व्यक्ती- पत्नी हयात असल्यास नाव व वय, संस्था-जिल्हा दक्षता समितीची शिफारस,संस्थेचा सार्वजनिक क्षेत्रातील एकूण अनुभव. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक