प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दि.03 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

  

 

अलिबाग,दि.1(जिमाका):- शासनाने खरीप हंगाम 2023 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दि. 31 जुलै 2023 अशी होती. तथापि, राज्यामध्ये कोकण व विर्दभातील काही जिल्ह्यामध्ये माहे जुलै 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, खडीत विज पुरवठा, खंडीत इंटरनेट सेवा, PMFBY पोर्टल सेवेतील व्यत्यय, आधार (UIDAI) व CSC सर्व्हरवरील व्यत्यय, राज्याच्या भूमीअभिलेख पोर्टलच्या तांत्रिक/ सेवेतील व्यत्यय इत्यादीमुळे शेतकऱ्यांच्या योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाने या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दि.03 ऑगस्ट 2023 पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ दिली आहे, असे आयुक्त कृषी, पुणे श्री.सुनिल चव्हाण यांनी कळविले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ 1/- रुपया भरून PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वतः तसेच बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इंन्शुरन्स अॅप व सामूहिक सेवा केंद्र (CSC) यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी तात्काळ आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी/जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त कृषी, पुणे श्री.सुनिल चव्हाण यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक