पासपोर्ट सेवा केंद्र कार्यान्वित

 


 

रायगड(जिमाका)दि.5:- रायगड जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढायचा असल्यास, ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठाणे कार्यालयात जावे लागत असे. मात्र भारतीय डाक विभाग व परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या समन्वयाने डाकघर अलिबाग येथे पासपोर्ट सेवा उपलब्ध झाली आहें. या पासपोर्ट सेवा केंद्राचा शुभारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला.

यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोस्ट विभगातील अधिकारी किशन शर्मा, अॅड. प्रविण ठाकूर, अमित नाईक उपस्थित होते.

 

रायगड जिल्ह्यातील असंख्य नागरिक, विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी परदेशवारीला जाण्याची संधी मिळते. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्त्वाचे आहे. मात्र, हे पासपोर्ट काढण्यासाठी रायगडकारांना ठाणे रिजनल पासपोर्ट कार्यालयात जावे लागते. यामुळे रायगड जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत शासनाने अलिबाग शहरातील जिल्हा डाकघर कार्यालयाच्या इमारतलगत पासपोर्ट कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला होता.  आत्ता रायगडकरांना पासपोर्टसाठी इतरत्र कोठे जावे लागणार नाही. 

०००००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड