शबरी आदिवासी घरकुल योजनेचा 2 हजार 38 लाभार्थ्यांना मिळणार लाभ


 

अलिबाग,दि.30 (जिमाका):-  आदिवासी उपयोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातींच्या व्यक्तींना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना राबविण्यात येते. याअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 2 हजार 38 लाभार्थ्यांना घरकुल  आवास योजनेचा लाभ देण्यास राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज मंजूरी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शबरी घरकुल आवास योजनेसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 यावेळी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण शशिकला अहिरराव आदि उपस्थित होते.

शबरी घरकुल योजनेंतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी रायगड जिल्ह्याकरिता एकूण 2 हजार 639 घरकुलांचा लक्षांक प्राप्त झाला आहे.  या प्राप्त लक्षांकामधून रायगड जिल्ह्यातील 14 गटविकास अधिकारी यांनी एकूण 2 हजार 38 पात्र लाभार्थ्यांची यादी मान्यतेसाठी  सादर केली होती. यानुसार या लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे.  ही वैयक्तिक लाभाची योजना असून यामुळे अनुसूचित जमातीच्या लोकांना निवारा उपलब्ध होणार आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक