खालापूर तहसिल कार्यालयाच्या वतीने महसूल सप्ताह शुभारंभ आठवडाभरात महसूल विभाग राबविणार विविध उपक्रम



अलिबाग,दि.1(जिमाका):- खालापूर तालुका तहसिल कार्यालयाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहाचा शुभारंभ भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे फलक लावणे, स्थानिक लोकप्रतिनिधी गावचावडीवर ऑनलाईन योजनांबाबत माहिती देणे, कार्यालय स्वच्छता व अभिलेख कक्ष अद्ययावत करणे, ई हक्क पोर्टल प्रभावी वापर, गाव तिथे स्मशानभूमी, दफनभूमी असे अनेक विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

महसूल सप्ताह दिनाचा पहिला दिवस असल्याने खालापूर तहसिल कार्यालयातील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच खालापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

महसूल सप्ताह दिनाच्या शुभारंभ प्रसंगी खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी, अप्पर तहसिलदार पूनम कदम, निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड, निवडणूक नायब तहसिलदार दशरथ भोईर, महसूल नायब तहसिलदार विकास पवार यांच्यासह खालापूर तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक