क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
रायगड,दि.3(जिमाका):- थोर स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार (संगायो) ज्ञानदेव यादव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम पोशेट्टी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment