तळा तालुक्यातील नवीन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 सोनसडे करिता मौजे बोरघरहवेली येथील शासकीय जागा हस्तांतरित

 


 

अलिबाग, जि.रायगड दि.2 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण स्तरापर्यंतच्या विविध शासकीय यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यापैकी पशुवैद्यकीय दवाखान्यांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाहीदेखील प्रलंबित होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.

            त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

             या पार्श्वभूमीवर तळा तालुक्यातील नवीन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 सोनसडे या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती, याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

              त्यानुसार मौजे बोरघरहवेली, ता.तळा जि. रायगड येथील गट.नं.507 एकूण क्षेत्र  3-51-50 हे.आर. पैकी सरकारी क्षेत्र 1-11-00 हे.आर.ही पैकी 0.10.00 हे.आर. जमीन महसूल मुक्त व सारामाफीने ही शासकीय जमीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे नवीन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 सोनसडे करिता हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतेच जारी केले आहेत.

            तळा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला पशुवैद्यकीय सुविधा मिळण्याच्या दृष्टीने हा लोकोपयोगी निर्णय घेण्यात आला आहे. 

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक