पल्स पोलिओ लसीकरण पनवेल, उरण, कर्जत, खालापूर तालुक्यात रविवारी लसीकरण मोहिम

पल्स पोलिओ लसीकरण
पनवेल, उरण, कर्जत, खालापूर
तालुक्यात रविवारी लसीकरण मोहिम
अलिबाग,दि.30,(जिमाका):- पोलीओ पासून बालकांचे संरक्षण होण्यासाठी 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना रविवार दिनांक 2 जुलै 2017 रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवून पोलिओचा ज्यादा डोस देण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
 या अभियानासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सज्जता केली असून जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत पूर्वतयारीचा आज आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.  सचिन देसाई,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, क्षयरोग नियंत्रण विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ठोकळ,  जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. वैशाली पाटील, जिल्हा  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. शेषराव बढे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. निलेश भोकरे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तयारीचा आढावा घेतला. तसेच सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखावा, अशा सुचना दिल्या. यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील 16 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व शहरी भागात बुथ उभारण्यात येणार असून सकाळी आठ ते सायंकाळी पाच  या वेळात डोस देण्यात येईल. रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यातील अपेक्षित लाभार्थी एक लक्ष 73 हजार 873 इतके असून  त्यासाठी ग्रामीण भागात 1064 आणि शहरी भागात 166 असे एकूण 1230 पोलीओ बुथवर तसेच रेल्वे स्थानक आदी गर्दीच्या ठिकाणीसुद्धा लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी 3108  आरोग्य् कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.  तसेच अंगणवाडी सेविका,शिक्षक तसेच खाजगी संस्थांचा देखील सहभाग आहे.  नागरिकांनी आपल्या शून्य ते पाच वर्षे वय असणाऱ्या बालकांना पोलीओचा डोस द्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक