चार कोटी वृक्ष लागवड सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे - पालकमंत्री प्रकाश महेता अलिबाग,दि.30,(जिमाका):- राज्यात चार कोटी वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ शनिवार दि.1 जुलै रोजी होत असून जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी केले आहे. दरम्यान या अभियानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व सज्जता केली असून वाडगाव ता. अलिबाग येथे केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते, पालकमंत्री प्रकाश महेता, जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीचा जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय उपस्थित राहणार आहेत. वाडगाव येथे शनिवार दि.1 रोजी दुपारी साडेबारा वा. हा कार्यक्रम होणार आहे. सहभागाचे आवाहन जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर व उपवनसंरक्षक अलिबाग यांनी केले आहे. ०००००

चार कोटी वृक्ष लागवड
सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे
- पालकमंत्री प्रकाश महेता
अलिबाग,दि.30,(जिमाका):- राज्यात चार कोटी वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ शनिवार दि.1 जुलै रोजी होत असून  जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी केले आहे.
            दरम्यान या अभियानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व सज्जता केली असून वाडगाव ता. अलिबाग येथे  केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते, पालकमंत्री  प्रकाश महेता, जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीचा जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास  जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय उपस्थित राहणार आहेत. वाडगाव येथे शनिवार दि.1 रोजी दुपारी साडेबारा वा. हा कार्यक्रम होणार आहे. सहभागाचे आवाहन जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी  राजेश नार्वेकर व उपवनसंरक्षक अलिबाग यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक