कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन अनिर्वाय

 


अलिबाग,जि.रायगड,दि.3 (जिमाका) :- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे अनिर्वाय आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, संस्था, महामंडळे, स्थानिक प्राधिकरण, शासकीय कंपनी, नगरपरिषद, सहकार, सहकारी संस्था, खाजगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम संस्था, इंटरप्रायझेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, सेवा पुरवठादार संस्था, विरतण व विक्री, वाणिज्य, व्यावसायिक संस्था, शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, रुग्णालये, सुश्रुषालये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडासंकुल, सेवा पुरवठा व इतर इ. आस्थापना यांनी आपल्या आस्थापनेत समिती गठीत झाल्याचा तसेच तक्रार प्राप्त असल्यास प्राप्त तक्रारीचा विहित नमुन्यातील अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा. तसेच एखादया कार्यालय / आस्थापना / मालकाने (अ) अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही (ब) अधिनियमातील कलम 13, 14 व 22 नुसार कारवाई केली नाही (क) या कायदयातील तरतुदीचे व जबाबदारीचे पालन न केल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

समिती गठणबाबत अधिक माहिती हवी असल्यास 02141-295321 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच शासन निर्णय सांकेतांक 201409161221081030 हा शासन निर्णय वेबसाईट www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रत्यक्ष भेटीसाठी या कार्यालयाचा पत्ता नीलपुष्प बंगला, नागडोंगरी, एमआयडीसी ऑफिससमोर, अलिबाग हा असून या कार्यालयाचा ई-मेल आयडी wedora@gmail.com  हा आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक