जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” रोहा येथे संपन्न

अलिबाग, दि.08 (जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त या आर्थिक वर्षातील पहिला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा काल (दि.07 जून) रोजी रोहा एमआयडीसी मधील रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन हॉल येथे पार पडला.

या मेळाव्यासाठी रोहा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री.डी.जी.नांदगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून तर रोहा, पुणे, तळोजा येथील एकूण 09 उद्योजक व त्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.



या रोजगार मेळाव्यात 249 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. यापैकी 94 उमेदवारांची प्राथमिक यादीत निवड झाली तर 10 उमेदवारांची निवड अंतिम यादीत करण्यात आली. या मेळाव्यास रोजगार इच्छुक उमेदवारांचा तसेच उद्योजकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक