शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी कृषी विभागामार्फत विभागस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

अलिबाग, दि.09 (जिमाका):- खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते याबाबत उद्भवणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत विभागस्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यात निविष्ठा तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली.

शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास या नियंत्रण कक्षात तक्रार करता येणार आहे. खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामावेळी येणाऱ्या अडचणींबाबत तक्रारी करता याव्यात यासाठी विभागस्तरावर तसेच जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

या नियंत्रण कक्षामध्ये कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रार नोंदविल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले जाईल. कृषी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण केले जाईल, असेही श्री.माने यांनी कळविले आहे.

नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी पुढीलप्रमाणे:-

विभागीय कार्यालय, ठाणे- 8691058094 toqcthanediv@gmail.com

रायगड-  9503175934 dsaoraigad@gmail.com

ठाणे- 7039944689 dsaothane.2013@rediffmail.com

पालघर- 9403821870 dsaopalghar@rediffmail.com

रत्नागिरी- 8668972337 dsaortn@rediffmail.com

सिंधुदूर्ग- 9404305848 saosindhu@gmail.com

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक