म्हसळा नगरपंचायत क्षेत्रातील सर्व्हे नं. 17/1 जमिनीमधील क्षेत्राचा मसणवटा म्हणून असलेला वापर बंद करण्याचे आदेश जारी


अलिबाग, दि.10 (जिमाका):- जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतकडील सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक 20, दि.10 मार्च 2022 नुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965, मधील कलम 253 मधील, पोटकलम (1) अन्वये प्राप्त अधिकारान्वये जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दि.31 मे 2022 पासून जिल्ह्यातील म्हसळा गावातील सर्व्हे नं. 17/1 जमिनीच्या 0-96-40 हेक्टर आर. क्षेत्रापैकी सावर रस्त्यासाठी वापरात असलेले माणगाव-म्हसळा रस्त्याच्या उत्तरेकडील क्षेत्र 0-13-50 हेक्टर आर.(अंदाजित), स्मशानभूमीसाठी वापरात असलेले माणगाव म्हसळा रस्त्याच्या उत्तरेकडील क्षेत्र 0-13-50 हे.आर.(अंदाजित), अतिक्रमित क्षेत्र 0-06-00 हे.आर. असे एकूण 0-53-00 हे.आर वापरात असलेले क्षेत्र वगळून उर्वरीत 0-43-40 हे.आर क्षेत्राचा मसणवटा म्हणून असलेला वापर बंद करण्यात येत आहे.

तरी नमूद 0-43-40 हे.आर क्षेत्रात जो कोणी कोणतेही प्रेत पुरील किंवा त्याची अन्यथा विल्हेवाट लावील त्यास, अपराध सिद्ध झाल्यानंतर 02 हजार 500 रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होईल, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक