प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांनी दि.31 जुलै अखेरपर्यंत e-KYC पूर्ण प्रमाणीकरण पूर्ण करावे -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

 


 

अलिबाग, दि.09 (जिमाका):- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना e-KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Corner या टॅब मध्ये किंवा पी.एम.किसान ॲपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थीना स्वतः e-KYC प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर e-KYC प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल. तसेच केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने e-KYC प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रति बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर फक्त रु.15 निश्चित करण्यात आला आहे.

तरी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी दि.31 जुलै 2022 अखेरपर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक