जिल्हा अग्रणी बँकेतर्फे जिल्ह्यात अलिबागमध्ये ग्राहक संपर्क मेळाव्याचे आयोजन

 

अलिबाग, दि.07 (जिमाका):- वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया तर्फे बुधवार, दि.08 जून 2022 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत होरिझोन हॉटेल, अलिबाग-मांडवा रोड, खडताळ पुलाजवळ, बुरूमखान, अलिबाग येथे भव्य ग्राहक संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अलिबाग शहर परिसरातील सर्व सरकारी, खाजगी अणि सहकारी बँका या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात छोट्या व्यावसायिकांना मुद्रा योजनेंतर्गत शिशु कर्ज, हातगाडी वाले, रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज, तसेच विविध MSME आणि गृह कर्ज, वाहन कर्ज आणि शेतकरी, मत्स्य व्यवसाय करणारे अणि कुक्कुट पालन आणि दूध व्यवसाय करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज, NRLM आणि कर्जत नगरपालिका भागातील बचतगटांना समुदाय कर्ज, नवीन व्यवसाय करु इच्छिणाऱ्या होतकरू उद्योजकांसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत PMEGP, CMEGP या योजनेंतर्गत संबंधित विभागामार्फत माहिती दिली जाणार आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत 35% अनुदान असेलेले PMFME अंतर्गत कृषी कर्ज आणि नाबार्डचे कृषी पायाभूत कर्ज याबाबत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

याकरिता 1) अर्ज, 2) आधार कार्ड किंवा पॅन कार्ड रेशन कार्ड, 3) फोटो व 4) बँक पासबूक इत्यादी कागदपत्रे घेऊन आपले खाते ज्या बँक शाखेमध्ये आहे त्या स्टॉलवर संबंधित कर्जाबद्दल अर्ज व मार्गदर्शन दिले जाणार आहे.

     तरी अलिबाग तालुक्यातील सर्व बँका एकाच छताखाली एकत्र येत असून या सूवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घेवून आपले व्यवसाय वृद्धिंगत करण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक