खरीप हंगाम 2022 करिता सोयाबीन बियाणे पेरणीबाबत कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केले शेतकऱ्यांना आवाहन

 


 

अलिबाग, दि.09 (जिमाका):- खरीप हंगाम 2022 मध्ये राज्यातील पेरणीची सद्य:स्थिती बघता राज्याचे कृषी आयुक्त श्री.धीरजकुमार यांनी सोयाबीन बियाणे पेरणीबाबत राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

त्यानुषंगाने 75 ते 100 मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. प्रति हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरून 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किवा प्लॅंटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्क्यापेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 03 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.

तसेच रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी 03 ते 04 सेंटीमीटर खोलीपर्यत करावी, असे आवाहन कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक