गोवर रुबेला लसीकरण मोहिम जिल्ह्यात आजअखेर 4 लाख 23 हजार बालकांना लसीकरण


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार दि.27 पासून गोवर रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात रायगड जिल्ह्यात शनिवार (दि.15 डिसेंबर)  अखेर जिल्ह्यातील 4 लाख 23 हजार 652  बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
 जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (शनिवार दि.15) दिवसअखेर  जिल्ह्यातील 126 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 19 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 1589 विद्यार्थ्यांना तर 105 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 11 हजार 643 विद्यार्थ्यांना अशा एकूण 13 हजार 232 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात 6 हजार 696 मुले व 6 हजार 536 मुलींचा समावेश आहे.  तर आज अखेर एकूण 2 लाख 20 हजार 435 मुले  व 2 लाख 3  हजार 217 मुली असे एकूण 4 लाख 23 हजार 652 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी  माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक