आंतरराष्ट्रीय भरड धान्य (पौष्टिक तृणधान्य) वर्ष 2023 निमित्त श्रीवर्धन येथे मल्टिमीडीया प्रदर्शनाचे आयोजन

 

 

अलिबाग,दि.१८(जिमाका):- केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोप्रादेशिक कार्यालय पुणे व राज्य शासनाचे विविध विभाग तसेच नगरपरिषद श्रीवर्धन यांच्या सहकार्याने श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यावर दि. 19 ते दि. 21 मे 2023 दरम्यान आंतरराष्ट्रीय भरड धान्य (पौष्टिक तृणधान्य) वर्ष 2023 निमित्त मल्टिमीडीया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

            या पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्वाविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी या मल्टीमीडीया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघानी 2023 हे वर्षे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणू साजरे करण्याची घोषणा केली आहे. मानवी शरीराला लागणारे पोषक घटक पुरवणारे अन्न म्हणून या धान्यांकडे बघितले जाते. या तृणधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, वरई, कोदो, कुटके,सावा, कूट्टु व राजगिरा या दहा धान्यांचा समावेश होतो. या  भरडधान्यांना सुपरफूड म्हटले जाते.

            या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 19 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून यावेळी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी, तहसिलदार महेंद्र वाकळेकर, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, नगरपरिषद मुख्याधिकारी विराज लबडे, पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे, तालुका कृषी अधिकारी डी.एल. कुंभार, तालुका क्रीडाधिकारी संदीप वांजळे, बालविकास सेवा अधिकारी श्रीमती अमिता भायदे, नगरपरिषद अभियंता प्रणय ठाकूर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी.कुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नागरिक आणि पर्यटकांसाठी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी शासनाच्या विविध योजना तसेत पौष्टिक तृणधान्यांची माहिती देण्यासाठी विविध शासकीय विभागांतर्फे स्टॉल्स् उभारण्यात  येणार आहेत.

प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले असून या प्रदर्शास सर्व नागरिक तसेच पर्यटकांनी भेटी द्याव्यात, असे आवाहऩ केंद्र व राज्य शासनाच्या तसेच श्रीवर्धन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक