म्हसळा येथील आय.टी.आय.मध्ये ऑनलाईन प्रवेश सुविधा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- आगरवाडा ता. म्हसळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ( आय.टी.आय) मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून ऑनलाईन प्रवेश सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येथे संधाता,नळकारागिर, कर्तन व शिवण या व्यवसायासाठी ऑगस्ट-2018  सत्र  प्रवेशाकरीता ऑनलाईन प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत. हे अर्ज भरुन विद्यार्थ्यांनी सकाळी 11 ते सायं. पाच वाजेपर्यंत या वेळात सादर करावेत.
प्रवेशाकरीता व्यवसाय, मंजूर जागा, शैक्षणिक अर्हता व  कालावधी पुढीलप्रमाणे-
1.)संधाता (वेल्डर)-16 जागा, प्रवेश उपलब्ध-21 जागा-दहावी पास,नापास,1 वर्ष.
2.)नळकारागिर (प्लंबर)-20 जागा,प्रवेश उपलब्ध-26, दहावी पास,1वर्ष.
3.) कर्तन व शिवण (स्युईंग टेक्नॉलॉजी)16 जागा,प्रवेश उपलब्ध-21, दहावी पास-नापास, 1वर्ष.
4.)जोडारी (फिटर)- 16 जागा,प्रवेश उपलब्ध-21, दहावी पास,2वर्ष.
5.) वीजतंत्री (इलेक्ट्रिीशियन) -16 जागा, प्रवेश उपलब्ध-21 जागा, दहावी पास,दोन वर्ष.
 6.) यांत्रिक इलेकट्रॉनिक (इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिकल)-20 जागा, प्रवेश उपलबध-26, दहावी पास,दोन वर्ष.
सविस्तर माहितीसाठी माहितीपुस्तकही ऑनलाईन उपलब्ध आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज http//admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावेत, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था-म्हसळा जि.रायगड यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड