मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा



 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14-  जिल्ह्यात  मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व  कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक-2018 जाहीर झाली आहे.  सोमवार दि. 25 जून 2018 रोजी  मतदान  असून सदर दिवशी महाराष्ट्र शासन निर्णय दि.25 जून  2011 अन्वये पदवीधर मतदार संघातील तसेच शिक्षक मतदार संघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित मतदारसंघाच्या निवडणूकीच्या दिवशी   मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा  मंजूर केली आहे.  सदर रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असेल असे उप जिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक