महाराष्ट्र फुटबॉल मिशन अंतर्गत जिल्ह्यात क्रीडा दिन उपक्रमः फुटबॉल, हॉकी स्पर्धांचे आयोजन


अलिबाग,(जिमाका)दि.8- 'महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन' अंतर्गत क्रीडा दिनानिमित्त दि. 29 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड व अलिबाग तालुका फुटबॉल असोसिएशन यांच्या  संयुक्त विद्यमाने आर.सी.एफ स्कुल, कुरुळ, ता.अलिबाग येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच क्रीडा दिनाचे औचित्य साधून मोहोपाडा ता. खालापूर येथे हॉकी स्पर्धा तसेच जिल्हा क्रीडा संकूलात क्रीडा संघटनांची कार्यशाळा असे विविध  उपक्रम राबविण्यात आले.
कुरुळ येथे फुटबॉल स्पर्धा
फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (FIFA) मार्फत 17 वर्षाखालील खेळाडूंसाठी 'फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा'  महाराष्ट्रात घेण्यात येणार आहे. या स्पर्धा दि.6 'ते 28 ऑक्टोबर 2017 या कालावधीत संपूर्ण देशात होणार असून एकूण सामन्यांपैकी 6 सामने नवी मुंबई येथील डी.वाय.पाटील स्टेडियम येथे होणार आहेत.
या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यात फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी व अधिकाधिक मुलांनी फुटबॉल खेळण्यासाठी प्रवृत्त व्हावे यासाठी 'महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत कुरुळ येथील आर.सी.एफ. स्कूल येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  अलिबाग येथील पोलीस निरीक्षक श्री.स्वामी, यांच्या हस्ते हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
 यावेळी जिल्हा कीडा अधिकारी महादेव कसगावडे, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा ठाकरे, क्रीडा शिक्षक रमेश भगत, बी.व्ही.मेश्राम,बाळासाहेब पारखे, बिपिन राऊत, क्रीडा अधिकारी सुनिल कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
मोहोपाडा येथे हॉकी स्पर्धा
  क्रीडा दिन हा मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. यानिमित  प्रिआ स्कूल मोहोपाडा ता. खालापूर येथे हॉकीचे प्रदर्शनिय सामने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जनता विद्यालय मोहोपाडा, ता.खालापूर, सेंट जोसेफ हायस्कुल लोधिवली ता.खालापूर, जना विद्यालय इंग्रजी माध्यमिक विद्यालय मोहोपाडा,ता.खालापूर इ.संघ उपस्थित होते.स्पर्धेतील विजयी संघातील खेळाडूंना हॉकी स्टीकचे व बॉल चे वाटप करण्यात आले.  यावेळी प्रिआ स्कुल मोहोपाडाच्या मुख्याध्यापिका सौ.मधु शैलेंद्र, रायगड हॉकीचे सचिव कैलास सोनार,खजिनदार गुरमित सिंग,मयुर तातरे, प्रतिक पारंगे,हॉकी रायगडचे रेफ्री हेड प्रेमकुमार, कोच भिमकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रीडा संघटनांची कार्यशाळा
 त्यानंतर जिल्हा क्रीडा संकूलात आयोजित कार्यशालेत  शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते नथुराम पाटील, संजय कडू  यांनी क्रीडा संघटक, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.  यावेळी राय्गड जिल्हा कुस्ती संघटनेचे मारुती आडकर,  जिल्हा हॅण्डबॉल संघटनेचे देवेंद्र चौघुले,  जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे,  क्रीडा अधिकारी घनश्याम राठी, विशाल बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक