डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना


अलिबाग,(जिमाका)दि.6:- अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राबविण्यात असलेली अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबविता जमीनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून सध्याची प्रचलीत विशेष घटक योजना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना' या नावाने राबविण्यास शासनाने दि.27 एप्रिल 2016 च्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे.
या योजनेमध्ये सन 2017-18 या वर्षात घटकनिहाय अनुदान मर्यादा याप्रमाणे-
1)नवीन विहीरीसाठी उच्चतम अनुदान मर्यादा –अडीच लक्ष रुपये.
2)जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये,
3)इनवेल बोअरींगसाठी 20 हजार रुपये,
4)पंप संच 25 हजार रुपये,
5)वीज जोडणी आकार 10 हजार रुपये,
6)शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरण एक लक्ष रुपये,
7)सुक्ष्म सिंचन- मंत्रीमंडळ उपसमितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार.
या योजनेंतर्गत वरील 7 बाबी असून लाभ पॅकेज स्वरुपात द्यावयाचा आहे.
लाभार्थी पात्रतेच्या अटी:-
लाभार्थी हा अनुसूचित जाती,नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे.शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत:च्या नावे किमान 0.40  हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे. लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य. दारिद्र्य रेषेखालील नसलेले अनुसूचित जाती,नवबौद्ध शेतकऱ्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न  दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल तेच लाभार्थी लाभ घेण्यास पात्र राहतील.दारिद्रय रेषेखालील (बीपीएल)यादीत अंतर्भूत शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पनाच्या मर्यादेची अट राहाणार नाही. परंतु ज्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न दीड लाख रुपयांच्या मर्यादेत आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसिलदार यांचेकडून सन 2016-17 चे उत्पन्नाचा अद्यावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.
            या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज, प्रस्ताव गट विकास अधिकारी, पंचायत समितीयांच्याकडे सादर करुन अर्जाची मूळ प्रत आवश्यक त्या कागदपत्रासह कृषि अधिकारी (वि.घ.यो.)  यांचेकडे स्वहस्तेजमा करावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी (वि.घ.यो.) पंचायत समिती यांचेकडे संपर्क साधावा,असेआवाहन कृषी विकास अधिकारी, रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड