जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक कार्यक्रम



अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.30-राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट 9- कळंब ता. कर्जत व पेण पंचायत समितीतील 46 वडखळ गण येथील पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, तो याप्रमाणे- दि.3 ते 8 जून नामनिर्देशन पत्र स्विकारणे,दि.10 जून नामनिर्देशन पत्र छाननी व निर्णय, दि.13 जून पर्यंत नामनिर्देशन पत्राबाबत निवडणूक निर्णय अधिकऱ्यांनी दिलेल्या निर्णयाबाबत अपिल करण्याची मुदत,  दि.17 जून जिल्हा न्यायाधीशांनी  अपिलावर सुनावणी घेऊन निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख,  दि.15 जून (जेथे अपिल नाही तेथे) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख व 19 जून (जेथे अपिल आहे तेथे) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख, दि.23 जून रोजी मतदानाची तारीख व 24 जून रोजी मतमोजणीची तारीख. सदर निवडणूक क्षेत्रात निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, असेही राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक