अल्पसंख्याक शाळांच्या पायाभूत सुविधा विकासासाठी अनुदान



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30-  शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून  राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान दिले जाते.  सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी या अनुदानाच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी  विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव  जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड- अलिबाग यांच्याकडे दि.31 ऑग्सट 2019 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव उच्चस्तर निवड समिती रायगड- अलिबाग यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक