पाली नगरपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.9 नोव्हेंबर 2021च्या आदेशान्वये डिसेंबर 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 17, मुदत समाप्त झालेल्या 2 व 7 नवनिर्मित अशा 26 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण तसेच सोडतीचा कार्यक्रम 2021 जाहीर करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील पाली नगरपंचायत ही नवनिर्मित नगरपंचायत असून या नगरपंचायतीची प्रभाग रचना व कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे.

 महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरीकरण अधिनियम 1965 मधील कलम 10 अन्वये सर्व आरक्षण नमूद करूनच प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात यावी. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित नगरपंचायत क्षेत्रात सभा आयोजित करून सोडत पद्धतीने अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करणे बंधनकारक आहे.

 मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि. 9 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये परिशिष्ट 1 मधील अ प्रारुप प्रभाग रचना आरक्षण टप्पा 1 अन्वये गुरुवार दि.11 नोव्हेंबर 2021 रोजी सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीकरिता नोटीस प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

 जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी रायगड जिल्ह्यातील पाली नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या आरक्षण सोडत पुढील नमूद ठिकाणी व नमुद दिनांकास आयोजित करण्यास निर्देश दिले आहेत.  त्यानुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

 नगरपंचायतीचे नांव- पाली, नियंत्रण अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम- श्री.यशवंत माने, उपविभागीय अधिकारी रोहा, कार्यवाही करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम- श्रीमती अंगाई साळुंखे (प्र.) मुख्याधिकारी, पाली नगरपंचायत
आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ :-शुक्रवार, दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वा.पासून,
आरक्षण सोडतीचे ठिकाण- भक्त निवास क्र.1 पाली नगपंचायत हद्दी, ता.सुधागड, जि.रायगड.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक