पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

  शनिवार दि.13 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. श्रीवर्धन येथे आगमन व नगरपरिषदे अंतर्गत मिनी अग्निशमन शिघ्र कृती वाहनाचा लोकार्पण समारंभ. स्थळ : नगरपरिषद कार्यालय, श्रीवर्धन. दुपारी 12.00 वा. श्रीवर्धन येथून शासकीय वाहनाने दिवेआगरकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा दिवेआगर येथे आगमन व विविध विकास कामांचे भूमिपुजन व उद्घाटन कार्यक्रम :-

दिवेआगर नं.1 ब्राम्हण समाज सामाजिक सभागृह भूमिपुजन कार्यक्रम, दिवेआगर नं.2 आगरी समाज सामाजिक सभागृह भूमिपुजन, दिवेआगर नं.3 कुंभार समाज सामाजिक सभागृह भूमिपुजन, दिवेआगर एस.टी.पिकअप शेड उद्घाटन समारंभ,  दिवेआगर अंतर्गत रस्ता उद्घाटन समारंभ, दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिराकडे जाणारा रस्त्याचे भूमिपुजन समारंभ. दुपारी 2.00 वा. राखीव. दुपारी 3.00 वा. दिवेआगर येथून शासकीय वाहनाने ता.रोहाकडे प्रयाण.सायं. 5.00 वा. रोहा येथे आगमन व विशाल जेनेरिक मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन. स्थळ : डॉ.जाधव हॉस्पिटल शेजारी, रोहा-कोलाड-रोड, त्रिमूर्तीनगर, दमखाडी, ता.रोहा, सायं.5.30 वा. रोहा येथून शासकीय वाहनाने वरसगावकडे प्रयाण. सायं.6.00 वा. वरसगाव येथे आगमन व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत वरसगाव नळ पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा व पद्यावती नगर ते कालवा रस्त्याचे उद्घाटन कार्यक्रम. सायं.7.00 वा. वरसगाव येथून शासकीय वाहनाने सुतारवाडीकडे प्रयाण. सायं.7.30 वा. सुतारवाडी येथे आगमन व राखीव.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड