पाली नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या (ना.मा.प्र) सुधारित आरक्षणाच्या हरकती व सूचना दाखल करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.09 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये जिल्ह्यातील पाली नगरपंचायत ही नवनिर्मित नगरपंचायत असल्याने या नगरपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण सोडतीची कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे. या आदेशाच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना, आरक्षण व सोडत कार्यक्रम टप्पा (अ) प्रारूप प्रभाग रचना आरक्षणासह अ.क्र.1 अन्वये प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव (नगरपंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातींची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण यासह) मुख्याधिकारी यांनी बुधवार, दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

या आदेशाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी, पाली नगरपंचायत यांच्याकडील दि. 10 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये या कार्यालयाकडे प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव (नगरपंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातींची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण यासह) सादर करुन पाली नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी गुरुवार दि. 11 नोव्हेंबर 2021 रोजी मान्यता दिलेली आहे.

आदेशान्वये परिशिष्ट 1 मधील पुढील टप्पा (ब) हरकती व सूचना तसेच सुनावणी मधील अ.क्र.1 अन्वये नगरपंचायतीतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलाआरक्षणाची (अधिसूचना कलम 10 नुसार) रहिवाश्यांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविण्याकरिता वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषद नगरपंचायतीच्या वेबसाईटवर शुक्रवार दि.12 नोव्हेंबर 2021  पर्यंत प्रसिध्द करण्याबाबत आदेशीत केलेले आहे.

आदेशामधील परिशिष्ट 1 मधील पुढील टप्पा (ब) हरकती व सूचना तसेच सुनावणी अ.क्र. 2 अन्वये प्रारूप प्रभाग रचना आरक्षणाच्या हरकती व सूचना स्विकारण्यासाठी पुढीलप्रमाणे अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

नगरपंचायतीचे नाव- पाली, हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव- श्रीमती अंगाई साळुंखे (प्र.) मुख्याधिकारी, पाली नगरपंचायत, दिनांक- शुक्रवार, दि.12 नोव्हेंबर 2021 ते मंगळवार, दि.16 नोव्हेंबर 2021 पर्यंत, वेळ :- सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत, हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- पाली नगरपंचायत, ता. सुधागड, जि.रायगड, प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ – जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग, बुधवार दि.17 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 पासून.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक