जिल्ह्यातील कोविड-19 लसीच्या दुसऱ्या डोसनंतर पूर्ण झालेल्या आणि 14 दिवस उलटून गेलेल्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक आणि गर्भवती महिलांना सर्व धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळांना भेट देण्याची परवानगी

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका): शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडील आदेशान्वये महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेशान्वये लागू केलेले निर्बंध शिथील करण्याबाबत अधिसूचनेनुसार सुधारीत निर्देश लागू करण्यात आलेले आहेत.

शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील मार्गदर्शक सूचनाच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याच्या हद्दीत पुढील आदेश होई पर्यंत यापूर्वी लागू केलेल्या निर्बंधामध्ये दि.07 ऑक्टोबर 2021 पासून प्रतिबंधीत (Containment Zone) क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे प्रार्थनास्थळ सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील आदेशान्वये कोविड-19 लसीच्या दुसऱ्या डोसनंतर पूर्ण झालेल्या आणि 14 दिवस उलटून गेलेल्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक आणि गर्भवती महिलांना या आदेशाच्या तारखेपासून सर्व धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी फेस मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्कॅनिंगची तरतूद आणि हात धुणे किंवा सॅनिटायझर अनिवार्य असेल. धार्मिक स्थळे/प्रार्थना स्थळे खुला करण्याबाबत शासनाकडील दि.24 सप्टेंबर 2021 सोबतचे मानक कार्यप्रणाली मधील इतर सर्व अटी व शर्ती कायम ठेऊन मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे आवश्यक आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड, तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी साथरोग अधिनियम, 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 प्राप्त अधिकारान्वये रायगड जिल्ह्यातील कोविड-19 लसीच्या दुसऱ्या डोसनंतर पूर्ण झालेल्या आणि 14 दिवस उलटून गेलेल्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक आणि गर्भवती महिलांना सर्व धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळांना भेट देण्याची परवानगी देण्यास मान्यता दिली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती/आस्थापना शासनाने यापूर्वी लागू केल्यानुसार दंडात्मक कारवाईस तसेच भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतुदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आदेशित केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड