इतर मागासवर्गीय उद्योजकांना सूवर्णसंधी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग कल्याण महामंडळाच्या विविध कर्ज योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी दि.29 नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका) :- राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग कल्याण महामंडळाची स्थापना केली आहे.

       समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु.1.00 लक्ष ची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज नाही) व 20 टक्के बीज भांडवल योजना तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष पर्यत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष ते 50.00 लक्ष पर्यंत) या योजनांचा समावेश आहे.

      सन 2021-22 या वित्तीय वर्षाकरीता विविध कर्ज योजनांचे रायगड जिल्हा कार्यालयास उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. थेट कर्ज योजना व 20 टक्के बीज भांडवल योजना या योजनांचे अर्ज जिल्हा कार्यालयात स:शुल्क उपलब्ध आहेत.  या योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमार्फत लाभार्थी निवडीसाठी सोमवार, दि.29 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

      तरी इच्छुक, गरजू इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील जास्तीत जास्त लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

    तसेच जिल्ह्यातील इच्छुक, गरजू इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेच्या अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट देवून  शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड चे जिल्हा कार्यालय, श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या., सदनिका क. 101, पहिला मजला, चेंढरे, अलिबाग, (दूरध्वनी क्र.-02141-224448) अथवा ई-मेल आयडी- dmobcalibagraigad@gmail.com येथे शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर तसेच उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील (मो.9096261053) यांच्याशी संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक