पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करावेत

 

 

रायगड,(जिमाका)दि.06:-  नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणेशेळी-मेंढी गट वाटप करणे1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2025-26 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरीपोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक/शेतकरी बांधवसुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे यांनी केले आहे.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच AH-MAHABMS (Google play Store वरील मोबाईल अॅपवर उपलब्ध ) मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच दि. 02.05.2025 ते 01.06.2025 या कालावधीतच स्विकारले जातील.

राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देतत्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देत पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.

विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली सात वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. सन 2021-22 पासून जिल्हास्तरीय पशुसंवर्धन विषयक विविध योजनांसाठी सुद्धा सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.

यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन 2021-22 पासून पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असूनत्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

   या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असूनअर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःचे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागिल वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी  1962 या  टोल फ्री क्रमांकावर सोमवार ते शनिवार सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत  किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार)पंचायत समितीजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयतालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा.

नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थीसाठी ah.mahabms.com या प्रणालीद्वारे Online स्वरूपात अर्ज मागवणे 2025-26- वेळापत्रक पुढीलप्रमाणे-दि.03 मे ते 02 जून 2025 ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, दि. 03 जून ते दि.07 जून 2025 रॅडमायझेशन पध्दतीने लाभार्थी प्राथमिक निवड, दि.08 ते दि.15 जून 2025 मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे, दि.16 ते दि.24 जून 2025 पशुधन विकास अधिकारी (विस्तार)पंचायत समिती  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे मार्फत कागदपत्रे पडताळणी करणे, दि.25 ते दि.27 जून 2025 लाभार्थी मार्फत कागदपत्रातील तृटी पूर्तता, दि.28 ते दि.30 जून 2025 कागदपत्रे अंतिम पडताळणी, दि.02 जुलै 2025 अंतिम लाभार्थी पात्रता यादी.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज