दि.24 नोव्हेंबर रोजी युवा महोत्सवाचे आयोजन युवा महोत्सवामध्ये सहभागासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

रायगड दि.20(जिमाका):- युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात येते. राज्यात सन 2023-24 या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नेहरु युवा केंद्र व कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्या यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे.

प्रत्येकस्तरावर विजयी होणारे युवक युवतींना राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी रायगड जिल्ह्यातील युवक युवतींना जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे माध्यमातून प्राप्त होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 घोषित केलेले असल्याने युवा महोत्वासाठी महाराष्ट्र राज्यात तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारीत जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

वयोगट व सहभागाची पात्रता- या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी 15 ते 29 वर्षे वयोगट राहील. (दि.01 एप्रिल 2023 रोजी परिगणना करण्यात येईल.), जिल्ह्यातील कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ तसेच 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवांना सदर युवा महोत्सवामध्ये सहभागासाठी पात्रता राहील. प्रथम नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणीचा अंतिम दि. 22 नोव्हेंबर 2023 राहील. युवा महोत्सवाचे आयोजन दि.24 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात येईल. नोंदणी करण्यासाठी विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज संपुर्ण माहिती भरुन फोटोसह स्कॅन करावे. स्कॅन PDF मध्ये करावे व dsoraigad.2009@rediffmail.com या ईमेल वर दि.22 नोव्हेंबर 2023 रोजी पर्यंत सादर करावे.

अधिक माहितीकरीता श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी यांना भ्र.क्र.8856093608 येथे संपर्क साधावा. संपर्क साधण्यासाठी काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्याच भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हाट्सअॅप व्दारे संपर्क साधावा.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक