अलिबाग बस स्थानकात प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी केली पथनाट्यातून मतदार नोंदणी विषयक जनजागृती

 


 

रायगड दि.20(जिमाका):-जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या माध्यमातून विशेष संक्षिप्त पुनर्नरीक्षण कार्यक्रम सन-2024 अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अलिबाग बस स्थानकात (दि.18 नोव्हेंबर ) रोजी प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी मतदार नोंदणी विषयक जनजागृती केली.

आपला मताधिकार गमावू नका जर तुम्ही एक जानेवारी 2024 किंवा त्याआधी 18 वर्षाचे होणार असाल तर दिनांक 27 ऑक्टोबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी करा, आवश्यक असल्यास मतदार यादीतल्या तपशीला दुरुस्त्या करा तसेच आपले नाव मतदार यादीत आहे की नाही ते तपासा ऑनलाइन नोंदणीसाठी वोटर सर्विस पोर्टलला भेट द्या किंवा वोटर हेल्पलाइन हे मोबाईल ॲप वापरा अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाला भेट द्या किंवा 1950 या वोटर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा.  या मोहिमेत नव मतदारांनी तसेच महिलांनी जास्तीत-जास्त प्रमाणात मतदार नोंदणी करावी असा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला. नमुना सहा, नमुना सात, नमुना आठ याविषयी देखील पथनाट्यातून मार्गदर्शन करण्यात आले तसेच विद्यार्थी महिला व दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष शिबिर दिनांक 18 व 19 नोव्हेंबर या कालावधीत राबविले जात आहे. याविषयी देखील पथनाट्यातून माहिती देण्यात आली तसेच 1 जानेवारी 2024 या आहार्ता दिनांकावर आधारित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्नरीक्षण कार्यक्रम याविषयीच्या पॅम्प्लेटचे वाटप उपस्थित जनसमुदायास करण्यात आले.

यावेळी या पथनाट्यास आगार व्यवस्थापक अलिबाग अजय वनारसे, मतदार डिस्ट्रिक्ट युथ आयकॉन रायगड तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी, आधार फाउंडेशन चे धनंजय कवठेकर तसेच पथनाट्यातील कलाकार प्रतीक कोळी, अथर्व भगत, पार्थ म्हात्रे, नेहा पाटील, निशांत नवखारकर, हर्षदा भगत, मल्लिनाथ जमादार आदी कलाकार सहभागी झाले होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक