मराठा आरक्षणासंदर्भात कागदपत्री पुरावे जिल्हयातील नागरिकांना सादर करण्याचे आवाहन दस्तावेज जुने अभिलेखे कागदपत्री पुरावे स्विकारण्यासाठी तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन


 

रायगड दि.20(जिमाका):- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी मा. न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे .  शासन निर्णयान्वये शासनाचे विविध विभागामार्फत जातप्रमाणपत्र वितरित करण्याकरीता पुरावे संकलीत करणेचे काम प्रगतीपथावर आहे. त्याअनुषगाने जिल्हयातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इतर जुने अभिलेखे स्वीकारण्यात येणार आहेत.  अधिक व्यापक कामकाज होणेकरीता नागरीकांमार्फत त्यांच स्तरावर असलेले पुरावे सादर करणे सोईचे होईल.

            रायगड जिल्हयातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इतर जुने अभिलेखे स्विकारण्याची येणार आहेत. सदर उपलब्ध पुरावे तालुक्यातील तहसिलस्तरावरील स्थापित विशेष कक्षात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात दि. 21/11/2023 ते 24/11/2023 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी त्यांचेकडील उपलब्ध पुरावे 2 प्रतीसह नमुद ठिकाणी सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक